वैजापूर जिल्हा सत्र न्यायालयातील न्या.आहेर व न्या.पवार यांची बदली वकील संघातर्फे निरोप

वैजापूर ,८ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर जिल्हा सत्र न्यायालय वकील संघातर्फे  जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.एम.आहेर  व प्रथम वर्ग न्यायधीश डी.एम.पवार यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एम.मोईयोद्दीन एम.ए. होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश आर.एम.करडे, दिवाणी न्यायाधीश आर.एन.मर्क,  न्या.एस.के.खान, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड संदीप डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी वकील संघाच्या उपाध्यक्ष ज्योती शिंदे, जेष्ठ सदस्य अँड प्रमोद जगताप, अँड पी.आर.निंबाळकर, अँड. कृष्णा ठोबरे, अँड.संदीप डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अँड.आर.डी.थोट, अँड.आर.एस. हरिदास, अँड.प्रवीण साखरे, अँड प्रदीप चंदने, अँड. के.बी.कदम, वकील संघ सोसायटीचे चेअरमन एस. पी. पवार, अँड राजू शिंदे, अँड.किरण त्रिभुवन, अँड. रामकृष्ण बोडखे,अँड.सचिन जानेफळकर, अँड. देवदत्त पवार, अँड.रविराज शिंदे, अँड. वैभव ढगे, अँड. शरद हरदे,अँड.महेश कदम, अँड. सचिन मगर, अँड. देविदास बावचे, अँड. योगेश थावरे, अँड अनिल रोठे, अँड नितीन बावचे, अँड.राजेंद्र शिरसाठ,अँड.एन. आर.गायकवाड, अँड. नितीन बोराडे, अँड. शंकर गोरे, अँड.अमोल भुसारे, अँड. रवी भाग्यवंत, अँड. आकाश ठोले, अँड. भंडारी, अँड. श्रेणीक कोठारी, अँड. राहुल धनाड, अँड. कुणाल हरिदास, अँड. चैतन्य हरिदास, अँड. सविता पाटणी, अँड. सय्यद नुजहत, अँड. प्रतीक्षा उबाळे, अँड. भिंगारे,अँड. ज्योती मगर, अँड. मयुरी भुसारे, अँड. ऐश्वर्या कोठारी यांच्यासह वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.  सूत्र संचालन ज्ञानेश्वर डघळे यांनी केले. अँड प्रदीप चंदने यांनी आभार मानले.