गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचा पुरस्कार देऊन सन्मान

वैजापूर ,​१ जून​/ प्रतिनिधी :- ग्रामीण भागात कोरोना संसर्ग काळात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या संवर्गात कार्यरत महिलांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता लोकांना आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्याचे कौतुक आ.रमेश पाटील बोरणारे  यांनी केले. पंचायत समिती सभागृहात बुधवारी सकाळी एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प विभागाकडून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार सोहळा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सांळुके, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, गणेश इंगळे , गोरख आहेर, गटविकास अधिकारी एच. आर. बोयनर, सहाय्यक गटविकास अधिकारी अमेय पवार, एकात्मिक बालविकास विभागाचे संतोष जाधव, विधी अधिकारी सुनील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांची पुरस्कारासाठी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या निवड समितीने पुरस्कारासाठी निवड केली होती.प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह आणि पाचशे रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

या कार्यक्रमाला माजी सरपंच हरिभाऊ सांळुके, चंद्रकांत पवार, सुदाम आहेर, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र कसबे, अरुण होले, हरिभाऊ साळुंके, राजूभाऊ छानवाल, सुभाष कदम, वसंत त्रिभुवन, सुदाम गोरे, विठ्ठल पगार, संदीप बोर्डे, अरविंद शेवाळे, चंद्रकांत पवार, दौलत गायकवाड, , राजेंद्र काटे, दादाभाऊ गुंजाळ, नितीन साळुंके, संभाजी पा शिंदे, मल्हारी पठाडे, राजेंद्र  चव्हाण, अनिल कुळधर, नवनाथ पवार, नरेंद्र सरोवर, शंकर  कदम, राधू अण्णा सरोवर, डॉ गणेश चव्हाण, रामनाथ तांबे, राजेंद्र  बावंचे, हरी ठोंबरे, विजय चोभे, दिलीप भांडे, दत्तू भाऊ खिल्लारे, संतोष बंगाळ, बाळासाहेब कदम, वाल्मीक वाळके, वाल्मीक बावचे सर्व सरपंच अंगणवाडी मदतनीस, सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.