वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील  कोल्ही येथे शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 23 लाख 78 हजार रुपये निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमीपूजन आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले.

याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती सुनिल कदम, विभागप्रमुख प्रकाश पाटील मतसागर, अशोक पाटील हाडोळे, सरपंच गणेश पाटील इंगळे, कनिष्ठ अभियंता किरण आवारे, विजय मगर, संदीप पवार, रहीम भाई, विजय शिंदे, रामभाऊ त्रिभुवन, भाऊसाहेब पाटील कदम, दिपक पाटील जाधव, संजय पाटील जाधव, राज पवार, आकाश जाधव, पंकज पवार, नामदेव पाटील मगर, सागर मगर यांच्यासह सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.