वैजापूर पोलिसांची हेल्मेट सक्ती मोहीम ;46 वाहनधारकांकडून 24 हजार रुपये दंड वसूल

वैजापूर ,२९ मे  / प्रतिनिधी :- रस्त्यावरील अपघातातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी वैजापूर पोलिसांनी दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती केली असून हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.

वैजापूर उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांनी वाहन चालकांना वेळोवेळी हेल्मेट घालण्याचे आवाहन केले होते मात्र वेळोवेळी सूचना देऊनही नागरिकांकडून याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आल्याने महक स्वामी व पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पैठणकर, दिनेश गायकवाड, रविंद्र साबळे, योगेश कदम यांच्या पथकाने शहरातील वर्दळीच्या आंबेडकर चौअ, बसस्थानक आदी ठिकाणी विना हेल्मेट दुचाकी चालकांना अडवुन त्यांच्याकडुन दंड वसुल केला. या कारवाईत 46 वाहनचालकांकडून 24 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला असुन वाहन चालकांमध्ये हेल्मेटच्या सुरक्षिततेबाबत जागृती करण्यासाठी ही मोहिम सुरु ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.