कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत शिक्षण

वैजापूर ,६ जून  /प्रतिनिधी :- भारतीय जैन संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्यातील कोविड मुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींचे मोफत शिक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी स्विकारली आहे. 2022 – 23  या शैक्षणिक वर्षात 5 ते 7 वी इयत्तेतीलच मुला-मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे.

प्रवेश घेतलेल्या मुला मुलींना 12 वी पर्यंत मोफत शिक्षण, निवास, भोजन, शिक्षण साहित्य, आरोग्य  तपासणी आणि औषधे इ. ची सोय वाघोली पुनर्वसन प्रकल्प येथे असणार आहे.नाव नोंदणीसाठीची अतिंम तारीख 10 जून 2022 आहे.अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे निलेशकुमार पारख यांनी दिली.नाव नोंदणी bit.ly/BJS_WERC_Adm या लिंक वर करता येईल.
अधिक माहितीसाठी – निलेशकुमार पारख 8600860090