संजीवनी ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के ; गीता गायकवाड तालुक्यात प्रथम

वैजापूर पालिकेतर्फे गीताचा सत्कार
वैजापूर ,२९ मे  / प्रतिनिधी :- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचलित येथील संजीवनी ज्युनिअर कॉलेजने बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही राखली आहे. गीता गुलाब गायकवाड या विद्यार्थिनीने वाणिज्य शाखेत 97 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तर विज्ञान शाखेत हिंदवी अशोक शेवाळे या विद्यार्थिनीने 88.33. टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. वाणिज्य शाखेत श्रेया राहुल पांडे हि विद्यार्थिनी 93.50 टक्के गुण मिळवुन दुसरी व आकाश नानासाहेब लांडे हा 93 टक्के गुण मिळवुन तिसरा आला आहे. याच शाखेत पवन संतोष गायकवाड (92.50 टक्के), संस्कृती अमित गायकवाड व प्रथमेश महेश जाधव यांनी 92 टक्के गुण मिळवत गुणवत्ता सिद्ध केली. दिपक मनोज संचेती यास 91.67 टक्के गुण मिळाले. विज्ञान विभागात साक्षी रामेश्वर पेहरकर हिने 86.33 टक्के व सावित्री कैलास काळे हिने 82.17 टक्के गुण मिळवत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे इन्स्टिट्युटचे अध्यक्ष नितिन कोल्हे, विश्वस्त अमित कोल्हे, सुमित कोल्हे, संचालिका निकिता कोल्हे, प्राचार्य योगेश देवकर यांनी अभिनंदन केले आहे. 

गीता गायकवाड हिचा पालिकेतर्फे सत्कार

तालुक्यात प्रथम आलेली गीता गायकवाड ही पालिकेचे कर्मचारी गुलाब गायकवाड यांची कन्या आहे. बारावीच्या परीक्षेत तालुक्यात सर्वप्रथम आल्याबद्दल तिचा पालिकेतर्फे माजी नगराध्यक्ष साबेर खान, मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.