वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा आ.रमेश बोरणारेंतर्फे सत्कार

वैजापूर, १ डिसेंबर  / प्रतिनिधी :-वैजापूर डॉक्टर्स असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा आ.रमेश पाटील बोरणारे यांच्यातर्फे बुधवारी (ता.30) सत्कार करण्यात आला.

आ.बोरणारे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या सत्कार सोहळ्यास माजी  नगराध्यक्ष साबेर खान, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील नानासाहेब जगताप, राजेंद्र पाटील साळुंके, डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ.एस.एम.जोशी, डॉ.सुभाष शेळके, डॉ.अमोल अन्नदाते, डॉ.सुहास रहाणे, डॉ.आशिष पाटणी, डॉ.सुभाष भोपळे, डॉ.संतोष गंगवाल, डॉ. नितेश शाह, डॉ.कोळपकर, डॉ.गणेश जगताप, डॉ. ईश्वर अग्रवाल, डॉ.रवींद्र कोठारी, डॉ. पंकज संचेती, डॉ. उध्दव सोनवणे, डॉ.बी.बी. शिंदे, डॉ.करमासे, डॉ.परेश भोपळे, डॉ. मनोज चव्हाण, डॉ. प्रतिमा सोनवणे, डॉ. प्रीती भोपळे, डॉ.परवीन शेख आदींची उपस्थिती होती.

आ. बोरणारे, डॉ. एस.एम .जोशी, डॉ. सुभाष भोपळे यांची यावेळी समयोचित भाषणे झाली. सूत्रसंचालन डॉ. संतोष गंगवाल यांनी केले तर डॉ. हर्षल तोडरवाल यांनी आभार मानले. या प्रसंगी संजय बोरणारे, रहीम खान, महेश बुणगे, श्रीराम गायकवाड, रणजित चव्हाण आदी उपस्थित होते.