बिअरची बाटली डोक्यात फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न ; आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

वैजापूर ,२९ मे  / प्रतिनिधी :- बिअरची बाटली डोक्यात फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज वैजापूर न्यायालयाने सोमवारी फेटाळला. त्यामुळे पोलिसांकडून त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिनेश शिंदे (रा. रोटेगाव) व सुदर्शन उर्फ गोट्या बहिरट (रा.‌गायकवाडवाडी) अशी या घटनेतील आरोपींची नावे असुन घटना घडल्यापासुन म्हणजे 8 मे पासून दोघेही पसार होते.

दरम्यान या घटनेत चार जणांविरुद्ध तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडुन जीवे मारण्याच्या आरोपाखाली वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यापैकी हरिष उर्फ हरि प्रकाश गायकवाड यास पोलिसांनी अटक केली असुन अन्य एकास अटकपुर्व जामीन मंजुर झाला आहे. दिनेश शिंदे व गोट्या बहिरट या दोघांच्या जामीन अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश पी. मी. मुळे यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत दोघांचाही अटक टाळुन जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने नामंजुर केला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड.मेहेर व ॲड. आकिब कुरेशी यांनी काम पाहिले.