चांडगाव ते जरुळ व जरुळ ते ७५२ -एच रस्ता दुरुस्ती कामांचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर ,​६​ मे  / प्रतिनिधी :- सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत वैजापूर तालुक्यातील चांडगाव ते जरुळ रस्ता दुरूस्तीसाठी ४  कोटी रुपये व जरुळ ते ७५२- एच रस्ता दुरूस्तीसाठी  ​३​ कोटी  ​५०​ लाख रुपये असा एकूण ७ कोटी ५०​ लाख रुपयांचा निधी आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून या कामांचे भूमिपूजन शनिवारी (ता.06) जरुळ येथे राज्याचे रोहयोमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे  यांच्या हस्ते झाले. 

आ.बोरणारे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष साबेरभाई, जिल्हा बँक संचालक रामहरीबापू जाधव, बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथराव मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य. सदस्य दिपक राजपूत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, शिवसेना शहरप्रमुख पारस घाटे, भाजप शहरप्रमुख दिनेश राजपूत, माजी उपसभापती राजेंद्र पाटील चव्हाण, युवासेना जिल्हा समन्वयक अमीर अली, युवासेनेचे तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, तालुकासमन्वयक गणेश निकोले, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील जगताप, गोरख पाटील आहेर, गणेश पाटील इंगळे, प्रशांत त्रिभुवन, उपतालुकाप्रमुख प्रकाश मतसागर, महेश  बुणगे, उपविभागप्रमुख मल्हारी पठाडे, सुनील कारभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी पालकमंत्री संदीपान भुमरे, आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची भाषणे झाली. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असल्याचे ते म्हणाले. तहसीलदार राहुल गायकवाड उपकार्यकारी अभियंता एस.बी.काकड, गटविकास अधिकारी एच.आर.बोयनर, तालुका कृषी अधिकारी आढाव, शासकीय गुत्तेदार भिकन लहामगे, सिताराम पाटील वैद्य, नगरसेवक शैलेश चव्हाण, सुरेश राऊत,  कमलेश आंबेकर, राजूभाऊ राजपूत, प्रेम राजपूत, शैलेश पोंदे, सरपंच बळीराम शिंदे, अशोक जगताप, मनोज लालसरे, राहुल शेळके, संतोष बंगाळ, अमोल बोरनारे, अतुल निकोले, संदीप सूरासे, प्रमोद गायकवाड, अप्पासाहेब पवार, विष्णू निकोले, वाल्मीक मतसागर, किरण आवारे, प्रदीप गायकवाड, सुनील निपटे, वाल्मीक बावचे, वाल्मीक जगताप, सचिन गायकवाड, नारायण बावचे, ज्ञानेश्वर मतसागर, सतीश मतसागर, दिगंबर मतसागर, रुस्तुम मतसागर, दत्तू इंगळे, दिनकर कुहिले, राहुल मतसागर यांच्यासह  ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.