वैजापूर- गंगापूर रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन तरुण जागीच ठार

वैजापूर ,२९ मे  / प्रतिनिधी :- दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुण ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले ही दुर्घटना शनिवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास गंगापूर रस्त्यावर घडली. सागर शिवसिंग राजपूत (वय 25 रा. परदेशी गल्ली, वैजापुर) व साहिल दत्तात्रय पगारे (वय 22 रा. शिर्डी जि.अहमदनगर ) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. 

या घटनेविषयी पोलिसांनी सांगितले की, शुभम साबळे (वय 20 र.पंचशील नगर वैजापुर ) व अजय दुशिंग (वय 22 रा. शिर्डी जि.अहमदनगर) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की सागर राजपूत हा रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास गंगापूर चौफुली येथून वैजापूरच्या दिशेने दुचाकी वर येत होता त्यावेळी सभांजी नगरकडे जाणाऱ्या दुचाकीशी धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवले. या अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.