वैजापूर शहरात बुद्ध पौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रम

वैजापूर ,​५​ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर शहरात बुद्धपौर्णिमा विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जेतवन बुद्ध विहार, दुर्गावाडी  मित्र परिवार व शहरातील विविध ठिकाणच्या मित्रमंडळ यांनी एकत्र  येऊन भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढली.

या मिरवणूकी दरम्यान आ. रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी प्रतिमा पूजन करुन भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आलेली ही मिरवणूक जेतवन बुद्ध विहार येथे पोहचल्यावर तेथे समारोप करण्यातआला. धोंडीरामसिंह राजपूत यांनी भगवान गौतम बुद्ध  यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थित साधक – साधिका यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, माजी उपनगराध्यक्ष अकिल शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन व प्रास्ताविक अशोक पगारे व सुनिल त्रिभुवन यानी केले.

एच.आर.भुईंगळ यांनी वंदना म्हटली. या नंतर खिरदान व अन्नदान कार्यक्रम झाला. या प्रसंगी बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, एम.आर.गणवीर, प्रा.प्रमोद पठारे, सेवानिवृत्त प्राध्यापक डी.,एस.गायकवाड, साहेबराव पडवळ, विलास त्रिभुवन, हरीभाऊ बागुल, राजेश गायकवाड, विशाल शिंदे, अशोक तांबुस, कोसे आप्पा, विलास,म्हस्के, श्री. दिवेकर, दीपक त्रिभुवन, किरण त्रिभुवन व बौध्द ऊपासक- उपसिका मोठ्या ससंख्येने उपस्थित होते