तलवाडा ते खंडाळा रस्ता दुरुस्तीच्या कामाचे भूमीपूजन

वैजापूर ,१३ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील तलवाडा ते खंडाळा प्रजिमा-२७ (पहिला टप्पा) रस्ता दुरूस्ती कामांसाठी २ कोटी ८५ लक्ष रुपये निधी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमिपूजन शनिवारी तलवाडा” येथे ह.भ.प पंढरीनाथभाऊ पगार महाराज (अध्यक्ष शिवाई संस्थान, शिवूर) यांच्या शुभ हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.रमेश बोरणारे होते.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरभाई, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा बँक संचालक रामहरी बापू जाधव, उपअभियंता एस.बी. काकड, बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथराव मगर, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, युवासेना जिल्हाप्रमुख सचिन मिसाळ, शिवसेना शहरप्रमुख पारस घाटे, भाजप शहरप्रमुख दिनेश राजपूत, राजेंद्र चव्हाण, युवासेना उपजिल्हाप्रमुख भरत कदम, बाजार समितीचे संचालक काकासाहेब पाटील, गोरख  आहेर, गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, मधुकर पवार, उपतालुकाप्रमुख प्रकाश वाघ, विभागप्रमुख अंबादास  खोसे, उपविभागप्रमुख पांडुरंग जगदाळे, दादासाहेब  पाटील फोपसे, ज्ञानेश्वर ठूबे यांची प्रमुख उपस्थिती होती.