मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथेसह सात जणांना अटकपूर्व जामीन

औरंगाबाद:
मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अंगावर खुर्ची भिरकाविण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्यासह सात जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.बी. पारगांवकर यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन प्रत्येक 15 हजारांच्या जात मुचक्यासह अटी व शर्तींवर मंजुर केला.
प्रकरणात महापालिकेचे प्रभारी सुरक्षा अधिकारी बाबु सांडू जाधव (59, रा. रामनगर) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, 26 जून रोजी मनसे जिल्हाअध्यक्ष सुहास दाशरथे हे कार्यकर्ते ऋषभ रगडे, गजत गोंडा पाटील, अमित भांगे, संदीप कुलकर्णी, प्रविण मोहिते व आमित दायमा यांच्यासह प्रभारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना निवेदन देण्यासाठी आले होते.प्रभारी अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या दालनात प्रवेश केला. तेथे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे, त्यची जबाबदारी कोण उचलणार या व अशा अनेक बाबींबाबत दाशरथे व निकम यांच्यात चर्चा झाली. चर्चा सुरु असतांना दशरथे यांनी अचानक चिडुन निकम यांच्या खुर्ची घालण्याचा प्रयत्न करित जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी निकम यांच्या दालनात उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षक व पोलिसांनी दाशरथे व त्यांच्या कार्यकर्त्यांना रोखत दालना बाहेर नेले. तेंव्हा सुरक्षा अधिकारी जाधव व त्यांच्या सहकार्यांच्या अंगावर धावून जात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


दरम्यान गुन्ह्यात अटक होउनये यासाठी वरील सातही जणांनी अटकपूर्व जामीनीसाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार आज या अर्जावर सुनावणी झाली असता न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिला. प्रकरणात सुहास दशरथे यांच्यासह सात जणांकडून अॅड. अभयसिंग भोसले, अॅड. जी.पी. पांडे व अॅड. जे.व्ही. देशपांडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *