जांबरगाव येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; पतीविरुद्ध गुन्हा

वैजापूर ,३ मे  / प्रतिनिधी :-  वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील विवाहितेने गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. निकिता लखन माळी (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्युची नोंद केली होती. मात्र, चौकशीनंतर या प्रकरणात पती लखन भगवान माळी (२४) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तु मला आवडत नाहीस, घरी निघुन जा, मला दुसरे लग्न करायचे आहे असे म्हणुन लखन निकिता हिस वारंवार त्रास देत होता. या त्रासाला कंटाळुन निकिता हिने रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असे तिचे वडील इंदास सोनवणे (रा. खरज) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. त्यावरुन आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.