वैजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव ऊस तोडणी देण्यासाठी शेजारच्या कारखान्यांना आदेश द्या – आ.बोरणारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वैजापूर ,८ मार्च / प्रतिनिधी :-  वैजापूर व गंगापूर तालुक्यात सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली असून शेतकरी नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे वळला आहे.त्यामुळे या तालुक्यात मोठ्याप्रमाणात ऊसाचे उत्पादन झाले आहे मात्र तालुक्यातील साखर कारखाने बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेजारच्या जिल्ह्यातील कारखान्यावर अवलंबून रहावे लागत आहे. ऊस तोड देण्यासाठी शेजारच्या साखर कारखान्यांकडून  ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेजारच्या जिल्यातील साखर कारखान्यांना ऊस घेऊन जाण्यासाठी आदेश देण्यात यावा अशी मागणी आ.रमेश पाटील बोरणारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तालुक्यातील साखर कारखाने बंद पडलेले असून, शेजारच्या जिल्ह्यातील साखर कारखाने ऊस घेत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे उसाच्या प्रश्नांसंदर्भात साखर आयुक्तांशी चर्चा चर्चा करून तालुक्यातील ऊसाचा प्रश्न मार्गी लावावा.अशी मागणी आ.बोरणारे यांनी केली आहे.