वैजापूर शहरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

वैजापूर ,३ मे  / प्रतिनिधी :- येथील विविध शासकिय कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य शासकीय कार्यक्रम तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात झाला. आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावर्षी पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकविल्यानंतर ‘ जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्य गीत म्हटले.

​उपविभागीय ​ अधिकारी कार्यालयात प्रभारी ​उपविभागीय ​ अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. नगरपालिकेत नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, हुतात्मा स्मारकात हिराबाई राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांनी संचलन केले व राज्य गीत गाऊन गौरवशाली महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष साबेरखान, मुख्याधिकारी भागवत बिघोत, प्रभारी गटविकास अधिकारी एच.आर. बोयनर, नायब तहसिलदार महेंद्र गिरगे, रामेश्वर महाजन, किरण कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदुलकर, डॉ. व्हीं.जी. शिंदे, आर.पी. क्षिरसागर, सहायक बीडीओ अमोल पवार, नगरसेवक दशरथ बनकर, उल्हास ठोंबरे, स्वप्निल जेजुरकर, डॉ. निलेश भाटिया, सखाहरी बर्डे, माधुरी बनकर, सुप्रिया व्यवहारे, अनिता तांबे, मुमताज सौदागर, बाबासाहेब गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.