छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाला नॅक बी प्लस मूल्यांकन

छत्रपती संभाजीनगर ,२८  एप्रिल / प्रतिनिधी :-कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाला अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे “राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद” (NAAC) B+ मूल्यांकन अधिस्वीकृती मिळाली आहे.         

NAAC म्हणजे National Assessment and Accreditation Council ज्याला मराठी भाषेमध्ये ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद’ असे म्हणतात. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद ही संस्थानांच्या गुणवत्ता दर्जाला समजण्यासाठी महाविद्यालय, विश्वविद्यालय आणि इतर मान्यताप्राप्त विद्यालय त्यांच्या उच्च स्तरावरील शिक्षण मूल्यांकन आणि मान्यताची व्यवस्था करते.  NAAC शैक्षणिक प्रक्रियांचे आणि त्यांच्या परिणामांचे अनुसंधान, सुविधा आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधाच्या संबंधित संस्थांच्या कार्यासंबंधी गुणवत्तेसाठी शैक्षणिक संस्थांना मूल्यांकन करत असते. या मूल्यांकन पद्धतीत  महाविद्यालयाच्या वर्गखोल्या (डिजिटल क्लासरूम ), शैक्षणिक गुणवत्ता, उपलब्ध साधनसामग्री, विविध मूल्यांकन मॉडेल्समधील मुद्दे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी आदी विविध मुद्यांचा समावेश केलेला होता. या सर्व मुद्द्यांचे मुद्देनिहाय मूल्यांकन करून  सापेक्ष प्रतवारी प्रणाली (रिलेटिव्ह ग्रेडिंग सिस्टम) करून बी प्लस  (B+) (CGPA 2.55 ) मूल्यांकन प्राप्त झाले आहे.            

दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीत मुळे यांनी दिली.       

शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण केली असून  ‘नॅक’ अधिस्वीकृती मुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिक वाढली असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांनी दिली.
        ‘नॅक’ अधिस्वीकृतीमुळे महाविद्यालयाकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक दर्जावर शिक्कामोर्तब झाले आहे, या पुढील काळात विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे दंत महाविद्यालय आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ. लता काळे यांनी व्यक्त केले.

————————————————————- 

CSMSS दंत महाविद्यालयाच्या ‘B+’ हा ‘ग्रेड मिळाला असून महाविद्यालयाचा CGPA 2.55 एवढा आला आहे. या मानांकनामुळे अनेक फायदे होणार असून शहरातील नामांकित आणि नॅक दर्जाप्राप्त आमचे महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना करिअर आणि उच्च शिक्षणासाठी निश्चितचं फायदा होईल. CSMSS दंत महाविद्यालयआणि रुग्णालयाच्या आमच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्न आणि परिश्रमाचे हे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

पद्माकरराव मुळे

सचिव,छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था  

———————————————————————-

          यावेळी कृषी महाविद्यालय संचालक डॉ. दत्तात्रय शेळके, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, मानव संसाधन अधिकारी श्री. अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील, दंत महाविद्यालय शैक्षणिक प्रमुख डॉ. संजय सरोदे आदी उपस्थित होते.