शंभरव्या मन की बात कार्यक्रमाचे छत्रपती संभाजीनगर शहरात ३५० ठिकाणी आयोजन -भाजप शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर

छत्रपती संभाजीनगर ,२७  एप्रिल / प्रतिनिधी :-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशातील जनते सोबत संवाद साधत असतात , विविध सामाजिक , शैक्षणिक , पर्यावरण , सांस्कृतिक अशा वेगळ्या विषयांवर देशातील जनतेसोबत संवाद साधत असतात .हा कार्यक्रम मागील सात वर्षापेक्षा अधिक काळापासून , महिन्याच्या प्रत्येक शेवटच्या रविवारी होत असतो.या कार्यक्रमाचा हा शंभरवा भाग येत्या रविवारी होणार असून , तो कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जनतेमध्ये याचे ऐकण्याचे आयोजन करण्यात यावे या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक बुथ ,वार्ड व शक्ति केंद्र या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे,

साधारणत साडेतीनशे ते चारशे ठिकाणी मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून , या मध्ये प्रत्येक ठिकाणी शंभर ते दीडशे पेक्षा अधिक जनसमुदाय हा कार्यक्रमाला ऐकण्यासाठी उपस्थित असेल असे नियोजन करण्यात येत आहे , त्याच बरोबर शहरांमधील प्रतिष्ठित व्यापारी , डॉक्टर , वकील , प्राध्यापक , पर्यावरण प्रेमी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 30 एप्रिल रविवार रोजी सकाळी अकरा वाजता ,आय एम ए हॉल ,समर्थ नगर या ठिकाणी विशेष स्क्रीनिंग अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली , शहरातील सर्व कार्यक्रम हे शहराध्यक्षांच्या नेतृत्वात होत असून याची आढावा बैठक तिरूमला मंगल कार्यालय गारखेडा परिसर या ठिकाणी पार पडली , या वेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड ,प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर , मन की बात संयोजक किशोर शितोळे, जिल्हा संघटन सरचिटणीस राजेश मेहता , समिर राजुरकर , शिवाजी दांडगे , दिलीप थोरत आदी मान्यवर उपस्थित होते , या वेळी शहरांमध्ये विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाची आढावा घेण्यात आला.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रत्येक बूथ वर कार्यकर्त्यांनी नमो एप डाऊनलोड करावा,तसेच त्यावर आतापर्यंत झालेल्या विविध कार्यक्रमाचे भाग उपलब्ध असतात , आपले पंतप्रधान काय करतात या विषयाचे सविस्तर माहिती यावर उपलब्ध असते , आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ॲपवर जाऊन वेळोवेळी अपडेट बघितले पाहिजे.सोशल मीडियामध्ये शेअर केले पाहिजे,जेणेकरून आपण जनतेसोबत संपर्कात राहून या दृष्टीने सोशल मीडियावर सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय राहिले पाहिजे ,तसेच जनतेच्या हिताचे निर्णय झाल्यानंतर ते जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे व गरजू व्यक्तींना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी तुम्ही आपल्या नेत्यांना संपर्क साधून लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने त्याचा लाभ पोहोचवला पाहिजे असे देखील मार्गदर्शन डॉक्टर कराड यांनी या वेळी केले

या वेळी शिवसेना वाहतूक सेनेचे प्रमुख जयस्वाल यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सोहळा पार पडला , तसेच अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला .