वैजापूर येथे काँग्रेसच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियान व बूथ कमिटी संदर्भात आढावा बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद

Displaying IMG-20220205-WA0122.jpg

वैजापूर ,५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्यावतीने आयोजित डिजिटल सदस्य नोंदणी अभियान व आढावा बैठकीस आज वैजापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील कृष्णा लान्स येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार कल्याणराव काळे होते. किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, राहुल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

Displaying IMG-20220205-WA0126.jpg

बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बाबीवर चर्चा होऊन डिजिटल सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. माजी आ.कल्याणराव जाळे, किरण पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील तांबे, जिल्हापरिषद सदस्य पंकज ठोंबरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष काझी मलीक, एराज शेख, सागर थोट,बाबासाहेब गायकवाड, सुशील आसर,सत्यजित सोमवंशी,अल्ताफ बाबा, रोहित आहेर,शेख आसिफ, निसार शेख,मलिक धोर्डे,सुनील कुंदे यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.