बिबी का मकबरा येथे जागतिक वारसा दिन साजरा

 छत्रपती संभाजीनगर,१८ एप्रिल / प्रतिनिधी :-  भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वारसा दिना निमित्त ‘बिबी का मकबरा’ येथे आज दिनांक रोजी चित्रप्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यमाहिती आयोग, संभाजीनगर खंडपीठाचे उपसचिव राजाराम सरोदे यांनी जागतिक वारसा चित्रप्रदर्शनीचे रिबिन कापून उद्घाटन केले. यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर सर्कलचे उपअभियंता, एम. सांबा शिवकुमार, प्रशासनिक अधिकारी, विलिश रामटेके, सहा. अधिक्षक, डॉ. प्रशांत सोनोने, सहा. अधिक्षक-अभियंता, डी. एस. दानवे, संवर्धन सहायक, संजय रोहनकर, सहा. पुरातत्वेत्ता, रजनिशकुमार, नंदकुमार विश्वपुरिया, केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रबंधक संतोष देशमुख, सहा. क्षेत्रीय प्राचर अधिकारी, प्रदीप पवार, कार्यालय सहा. प्रीती पवार व ज्ञानेश्वर विद्यालायाचे मुख्याध्यापक, सलीम व शिक्षक अधाने , मडके , सय्यद उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमात शासनाच्या पंजिकृत शाहिर जाधव व संच यांच्या देश्भाक्तिपर पोवाडा, पथनाट्य, गीत आदी तसेच शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, संगीत विभागाचे विद्यार्थी सचिन इघारे, आकांशा फुंडे व केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रीती पवार यांनी देश्भाक्तिपर गाणी सादर केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे व विशेष अतिथींचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रश्न विचारून विजेते विद्यार्थी विकास देवकाते, लुमेश देशमुख, रोनक खोब्रागडे, मोहम्मद मुस्ताक्विम व गौरव थोरात यांना बक्षिसे देऊन पुरस्कुत करण्यात आले. कार्यक्रम समाप्ती नंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोचे प्रदीप पवार, प्रिती पवार, शरद सादिगले, आणि प्रभात कुमार,  भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे प्रशासनिक अधिकारी, विलिश रामटेके, सहा. अधिक्षक, डॉ. प्रशांत सोनोने, संवर्धन सहायक, संजय रोहनकर, सहा. पुरातत्वेत्ता, रजनिशकुमार व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.