छायाचित्रकार बैजू पाटील जगात दुसऱ्या क्रमांकावर:,प्रतिष्ठेचा ब्रिटनचा पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर,४ ऑगस्ट /प्रतिनिधी :-युके मोनोव्हिजन्स कृष्णधवल छायाचित्र पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आले. प्रख्यात छायाचित्रकार बैजू पाटील  यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे 

जगभरातून ३७ हजार फोटो या स्पर्धेमध्ये आले होते.२७ देशातून या स्पर्धेसाठी भाग घेतला होता या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा ब्लॅक अँड व्हाईट वन्यजीव हा या स्पर्धेचा विषय होता. बैजू पाटील हे मागील 36 वर्षापासून वाइल्डलाइफ फोटोग्राफी करत आहेत आत्तापर्यंत त्यांच्या नावावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहे हा फोटो भरतपूर राजस्थान बोर्ड सेंचुरी येथे काढलेला आहे भारतामध्ये हे अतिशय प्रसिद्ध पक्षी अभयारण्य आहे व या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात प्राणी देखील दिसतात.  हा फोटो थंडीच्या दिवसात काढलेला आहे.  ह्या छायाचित्रांमध्ये दोन jackal  (कोल्हा )दिसत आहे व एक मध्यभागी उभा राहून त्यांची गंमत बघत आहे . भरतपूर मध्ये थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त थंडी पडल्यामुळे अनेक प्राणी मरून पडतात आकाशामध्ये कावळे व गिधाड हवेत उडून तिथे गिरट्या मारतात व ते  खाण्याकरता खाली उतरतात व बऱ्याच प्रमाणात आवाज होतो.  पक्ष्यांचा ह्या आवाजामुळे हे प्राणी या ठिकाणी आकर्षित होतात व पाच पाच सहाच्या गटाने या ठिकाणी येतात व खाण्यासाठी चढाओढ लागते व बऱ्याच प्रमाणात येथे प्राण्यांचे भांडण होतात.  प्रत्येक जण हे खाण्यासाठी आपला पहिला अधिकार आहे असे दाखवतो.  जेव्हा प्राण्यांचे  भांडताना आवाज होतात त्या आवाजाला घाबरून पक्षी तिथून लगेच घाबरून उडून जातात याचवेळी अतिशय दुर्मिळ असा हा क्षण बैजू पाटील यांनी काढून एक इतिहास रचला आहे व भारताचे नाव पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध केले आहे.  या पुरस्कारामुळे बैजू पाटील यांचे कौतुक होत आहे . 

Certifcate