किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी आठ आरोपींना कोठडी 

छत्रपती संभाजीनगर,५  एप्रिल / प्रतिनिधी :-  किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी आठ आरोपींच्‍या विशेष तपास पथकाने सोमवारी दि.३ रात्री मुसक्या आवळल्या. आरोपींना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. वानखडे यांनी बुधवारी दि.५ एप्रिल रोजी दिले.

सय्यद शहेबाज सय्यद जिलानी (२४, रा. शरिफ कॉलनी, कटकट गेट), शेख कलीम शेख सलीम (२५, रा. नेहरुनगर, कटकट गेट), शेख सोहेल शेख खाजा (२०, रा. गल्ली क्रं. ४, किराडपुरा), आमेर सोहेल लतीफ खान (२४, रा. न्‍यु बायजीपुरा), अल खुतुब हबीब हमद (३०, रा. बायजीपुरा), हबीब हसन हबीब उमर (३६, रा. बायजीपुरा), राशेद दिप सालमीन दिप (२३, रा. इंदिरा नगर, बायजीपुरा), सोहेल खान अमजद खान (२१, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्‍हा हा गंभीर स्‍वरुपाचा आहे. आरोपींचे आणखी कोण सा‍थीदार आहेत याबाबत आरोपींकडे चौकशी करायची आहे. गुन्‍ह्यात वापरलेले लाठ्या-काठ्या, सळ्या हस्‍तगत करायचे आहेत. त्‍याचप्रमाणे गुन्‍हा करण्‍यामागे आरोपींचा नेमका हेतु काय होता याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी यांनी न्‍यायालयाकडे केली होती. त्‍यानंतर न्‍यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.