छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम संस्काराच्या एम. बहा टीमला राष्ट्रीय पातळीवर संशोधनामध्ये प्रथम तर रेसिंगमध्ये देशात दुसरा क्रमांक

छत्रपती संभाजीनगर,१३  एप्रिल / प्रतिनिधी :-  कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित (सी. एस. एम. एस. एस.) छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम संस्काराच्या एम बहाने राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट संशोधनामध्ये प्रथम तर रेसिंगमध्ये देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे.
       इन्फी लीग मोटर स्पोर्ट्स आयोजित ए. टी. व्ही. सी. २०२३ यांनी एम. बहा ही राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा दि. १ मार्च ते ५ मार्च दरम्यान पुणे येथे आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये सी. एस. एम. एस. एस. छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम संस्काराच्या एम बहाने सहभाग घेतलेला होता. (नॅशनल लेवल ऑल टरेन वेहिकल डिजाईन अँड मॅनुफॅकचरींग). यामध्ये टीम संस्काराने ज्वलन इंजिन श्रेणीमधील रेसमध्ये द्वितीय तर सर्वोकुष्ट संशोधनासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी स्वतःचा कॅटलॅटीक कनवर्टर (सायलेन्सर) तयार केला होता.
त्यामध्ये कॅप्टन कार्तिक गिते (कॉम्पुटर सायंस इंजिनीअरिंग) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शाखेमधून रामेश्वर जाधव, महेश पालवे, अभिषेक लाले, विशाल बारगळ, प्रतिक पांढरे, तीर्थराज आहेर, संदीप गोमलाडू, मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेमधून प्रांजल राठोड, ऋतुजा सुरसे, वैभव वाघ, यशवंत साळुंके, ऋषिकेश नरवाडे, आदित्य सकटे, गणेश मुरारीकर, करण मगर, गंगाधर लुटे आणि  इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग शाखेमधून विनोद साळुंके, सोमेश राजपूत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रा. पवन चौधरी, प्रा. रवींद्र सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा विद्यार्थ्यांनी पार पडली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजित मुळे, सचिव श्री . पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, विभागप्रमुख डॉ. रामचंद्र चोपडे, डॉ. देवेंद्र भुयार, प्रा. अभय मुदिराज यांनी अभिनंदन केले आहे.