१६ आमदार अपात्र ठरले तरीही सरकारकडे बहुमताचा आकडा  कायम-अजित पवार

मुंबई,१६  एप्रिल / प्रतिनिधी :-  गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशामध्ये ते काही दिवसांपूर्वी नॉट रिचेबल राहिल्याने चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचादेखील भेट घेतल्याची चर्चा सुरु आहेत. अशामध्ये त्यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा माविआमध्ये गोंधळ असल्याचे चित्र उभे राहिले आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार, अशी चर्चा आहे. तसेच, १६ आमदार अपात्र झाल्यावर मुख्यमंतीर एकनाथ शिंदेंना पायउतार व्हावे लागणार, असे बोलले जात आहे.

१६ आमदार अपात्र जरी ठरले तरीही हे शिंदे – फडणवीस सरकार पडणार नाही, असा अप्रत्यक्ष दावाच अजित पवार यांनी केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “अपक्ष आमदार पकडून भाजपकडे ११५ आमदार आहेत. यामध्ये भाजपचे १०६ आणि ९ अपक्ष आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत गेलेले ४० आमदार, १० अपक्ष आमदार हे जरी बाजूला ठेवले तरीही, १५५ आणि १० अपक्ष असे १६५ आमदार सध्या राज्य सरकारकडे आहेत. त्यामुळे ते १६ आमदार अपात्र ठरले तरीही सरकारकडे बहुमताचा आकाड कायम राहणार आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.