सरकारची सापत्न वागणूक, लोक तडफडत आहेत याकडे केंद्राचे लक्ष नाही-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई ,२६ एप्रिल /प्रतिनिधी 

राज्यात काही घटना घडली की त्याचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी सनसनाटी घटना तयार करायची अशी भाजपाची भूमिका अनेकदा दिसून आली आहे. केंद्रीय संस्था भाजपच्या हाती असल्याने ते सांगतील तीच गोष्ट होते. वास्तविक ऑक्सिजन, रेमडेसिवीर याबद्दल केंद्र सरकारमध्ये अत्यंत नाराजी आहे. त्यांचे वाटप, त्यांची सापत्न वागणूक, लोक तडफडत आहेत याकडे केंद्राचे लक्ष नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आज माध्यमांशी बोलताना म्हणाले.

पश्चिम बंगाल येथे निवडणुकीसाठी जाऊन एका महिलेला हरविण्यासाठी प्रयत्न सुरू असून या सर्व प्रकरणावर एका माजी पोलीस प्रमुख अधिकाऱ्याने लेख लिहिला आहे. ज्यात त्यांनी उल्लेख केला होता की, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन दबाव आणावा हे फार चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही स्वस्थ रहा असा सल्लाही त्यांनी लेखातून दिला आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे. तसेच नियतीने जे लिहिलं आहे त्याच वेळी शपथ होईल. मी पुन्हा येईल बोलून काही होणार नाही असा टोला हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

केंद्र सरकारने ५-६ महिन्यात योग्य ती खबरदारी घेतली नाही. ते अनेक कामात गुंतलो, निवडणुका महत्त्वाच्या मानल्या, धार्मिक कार्यक्रम केले. कोरोना हा मशिदीत किंवा कुंभ मेळ्यात गेलेल्या कोणालाही सोडत नाही. त्यामुळे आपण हा कोरोना रोखण्यासाठी फार कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकारचा आभार मानावे लागतील. राज सरारकाने ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राची मदत मिळेल परंतू त्यावर अवलंबून न राहता जनतेला दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.