महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांना कार्यगौरव पुरस्कार 

छत्रपती संभाजीनगर,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांना सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी कार्यगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.     

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे एका खास समारंभात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांसह जनसंपर्क अधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले. जनसंपर्कातील उत्कृष्ट कामगिरीसाठी ज्ञानेश्वर आर्दड यांना पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमास  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, संपादक जगदीश बियाणी, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.    

आर्दड हे दशकभराहून अधिक काळ महावितरणमध्ये कार्यरत असून, त्याआधी त्यांनी हैदराबाद, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व जालना येथे वृत्तवाहिनी, आकाशवाणी व विविध वृत्तपत्रांत पत्रकार म्हणून काम केलेले आहे.या पुरस्काराबद्दल आर्दड यांचे महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.