देशभरातील कोरोना सक्रिय रुग्णांचा आकडा २८ हजार पार, महाराष्ट्र नंबर २ वर

नवी दिल्ली :– देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात ६ हजार ०५० नवीन रुग्ण आढळले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडाही २८ हजार ३०३ वर पोहोचला आहे. गेल्या सात दिवसांमधल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोनाच्या वाढणाऱ्या रुग्णांमध्ये केरळनंतर महाराष्ट्र दूसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत ९२६ कोव्हिड रुग्ण आढळले असून सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ४८७ रुग्ण इतकी आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा एप्रिलच्या ६ दिवसांच्या तुलनेत मार्चच्या ३१ दिवसांपेक्षा जास्त आहे. संपूर्ण मार्च दरम्यान कोरोनाचे ३१ हजार ९०२ नवीन रुग्ण आढळले. तर एप्रिलच्या केवळ ५ दिवसांतच २० हजार २७३ नवीन रुग्ण आढळले आहेत.सरासरी पाहिल्यास मार्चमध्ये दररोज सरासरी १ हजार नवीन केसेस आढळून आल्या, तर एप्रिलमध्ये दररोज सरासरी ४ हजार केसेस समोर येत आहेत. संसर्गाचा दर असाच राहिला तर एप्रिलमध्ये १.२० लाख नवीन रुग्णांची शक्यता आहे.

कोविड-१९ अद्ययावत माहिती

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 220 कोटी 66 लाख लसींच्या एकूण `मात्रा दिल्या गेल्या (95 कोटी 21 लाख दुसऱ्या मात्रा आणि 22 कोटी 87 लाख वर्धक मात्रा )

गेल्या २४ तासांत 2,334 लसमात्रा दिल्या गेल्या.

भारतात सद्यस्थितीत कोविड बाधितांची ताजी आकडेवारी 28,303 एवढी आहे

सक्रिय रुग्णांची संख्या 0.06% आहे 

रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% आहे 

गेल्या 24 तासात 3,320 रुग्ण बरे झाले असून यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,41,85,858 झाली आहे.

गेल्या 24 तासात 6,050 नवीन बाधितांची नोंद झाली

रोज बाधित होण्याचा दर (3.39%) आहे

साप्ताहिक बाधित होण्याचा दर (3.02%)आहे

आतापर्यंत 92 कोटी 25 लाख एकूण चाचण्या केल्या गेल्या. गेल्या 24 तासात 1,78,533 चाचण्या झाल्या.