शिवना नदीवरील बंधारा दुरुस्तीच्या कामाचा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर ,७ एप्रिल  / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभाग अंतर्गत आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या मौजे शिरसगाव येथील शिवना नदीवरील को.प.बंधारा दुरुस्तीसाठी 4 कोटी 76 लाख 43 हजार रुपये निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ शुक्रवारी (ता.06) श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटाचे पिठाधीश गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी  यांच्याहस्ते आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.

.

या कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष काळवणे, बाजार समितीचे माजी सभापती  भागिनाथराव मगर, जिल्हा समन्वयक  चव्हाण, तालुकाप्रमुख अनिल चव्हाण, माजी उपसभापती महेंद्र पाटील गंडे, शेषराव पाटील साळुंके,  ह.भ.प. मधुकर महाराज, ह.भ.प. रामभाऊ महाराज, उपतालुकाप्रमुख नानासाहेब धोत्रे, सुनील पोळ, रामभाऊ पाटील धोत्रे, बद्रीनाथ पाटील चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख सतीश पाटील हिवाळे, विभागप्रमुख रामनाथ पाटेकर, उपकार्यकारी अभियंता लांडगे, शासकीय गुत्तेदार डावखर, सरपंच अनिल राजगिरे, जगदीश साळुंके, दत्तू पाटील खपके, ऋषिकेश मनाळ, महेश मनाळ, चंदणसिंग बेडवाल, जालम महेर, राम पा चव्हाण, अक्षय राजपूत, आकाश लेकुरवाळे, उपविभागप्रमुख विजय काकडे, तात्याराव शिरसाठ, तात्याराव भुसारे, रवीद्र दंडे, साईनाथ चव्हाण, रविकाका साळुंके, दत्तू पा निकम, सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, उपसरपंच सुनिता ताराचंद निजे, अक्षय शिरसाठ, प्रनजंय शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.