वैजापूर शहरातील विविध विकास कामांचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,७ एप्रिल  / प्रतिनिधी :- राज्य शासनाच्या नगरविकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्येपूर्ण योजनेतून वैजापूर शहराच्या विविध विकासकामांसाठी आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 65 कोटीच्या निधीतून संकटमोचन हनुमान जन्मोत्सवाचे औवचित्य साधून गुरुवारी (ता.06) एकूण 8 कोटी 30 लाख रुपये निधीच्या सिमेंट रोड, सुशोभीकरण, वॉल कंपाऊंड, सभागृह, स्ट्रीट लाईट, पेव्हर ब्लॉक अश्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजनाचा शुभारंभ आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्षसाबेरभाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, सहाय्यक पोलीस अधीक्षक  महक स्वामी, पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, शिवसेना ज्येष्ठ नेते खुशालसिंग राजपूत, प्रकाश बोथरा, तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, भाजप तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, नगरपालिका अभियंता प्रकाश पाटील, शहरप्रमुख पारस घाटे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव पाटील औताडे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सुलभाताई भोपळे, शहरप्रमुख सुप्रिया व्यवहारे, नगसेवक दशरथ बनकर, डॉ. निलेश भाटिया, गणेश खैरे, ज्ञानेश्वर टेके, गोकुळ भुजबळ, शैलेश चव्हाण, स्वप्नील जेजुरकर, बजरंग मगर, सुरेश तांबे, युवासेना जिल्हासम्वयक अमीर अली, तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, शंकर जोरे, उपतालुकाप्रमुख महेश बुणगे, उपशहरप्रमुख कमलेश आंबेकर, शंकर मुळे, महेश भालेकर, अमोल बोरनारे, श्याम साळुंके, राजवीर त्रिभुवन यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.