आ.सतीश चव्हाण यांची महालगावला भेट: शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे यांच्याशी राजकीय परिस्थितीवर चर्चा

वैजापूर,​५​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव तथा विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी आज वैजापूर तालुक्यातील महालगांवला भेट दिली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी विविध विषयावर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले.  साईनाथ आहेर यांच्या निवासस्थानी त्यांची जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यांच्याबरोबरही बैठक झाली.

आ.चव्हाण यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर तसेच भविष्यात आखण्यात येणाऱ्या रणनीती विषयी त्यांच्याशी चर्चा केली.पुढील राजकीय वाटचालीस गलांडे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.   यावेळी शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख डॉ. प्रकाश पाटील शेळके, डॉ.अभय थावरे,  विजय पाटील पवार, बाळु पाटील शेळके (पालखेड) गणेश चव्हाण, तुकाराम आहेर, जनार्धन चव्हाण सरपंच रामभाऊ जाधव श्री राजु पा गलांडे गणेश पा शेळके रमेश मतकर सर प्रविण दादा देवकर योगेश मोहीते व गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.