वैजापूर शहरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

वैजापूर ,​३०​ मार्च / प्रतिनिधी :- समस्त भारतीयांचे आराध्य दैवत असलेले श्री प्रभू रामचंद्र यांचा जन्म सोहळा येथील मार्केट यार्ड मध्ये असलेल्या श्रीराम मंदिरात गुरुवारी (ता.30) सकाळी उत्साहात साजरा करण्यातआला. “सियावर रामचंद्र की जय”, जय श्रीराम! जय श्रीराम !!, “प्रभू रामचंद्र की जय” अशा जयघोषात शेकडो नागरिकांनी  घोषणा देत झाला. त्या आधी पूजेचे मानकरी म्हणून नवं दाम्पत्य अजय सुरेश तांबे व कल्याणी अजय तांबे यांनी सपत्नीक पूजा केली. मंदिरात भक्त भाविकांची अलोट गर्दी लोटली होती.

जन्मोत्सव समिती अध्यक्ष सुरेश तांबे, उपाध्यक्ष प्रफुल संचेती, सचिव सतिष कुलकर्णी, कोषाध्यक्ष माधवराव बावचे, निखिल कासलीवाल, सहसचिव संजय व्यवहारे, राजेंद्र मालपाणी, प्रकाश व्यास, महावीर जैन, अशोक शिंदे यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. या समयी नगरसेवक गणेश खैरे, धोंडीरामसिंह राजपूत, मकरंद कुलकर्णी, किरण राजपूत, सीताराम व्यवहारे, संतोष पवार यांच्यासह जन्मोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. स्वप्नील राजपूत यांच्या मडळाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवली होती.

यानिमित्ताने रक्तदान शिबिर ही आयोजित केले होते. छत्रपती संभाजीनगर येथील लोकमान्य ब्लड बँक गेल्या 27 वर्षापासून  रामनवमी उत्सवात रक्त संकलन करते. त्यांनी35 रक्त दात्यांचे रक्त संकलित केले. शहरातील संकट मोचन मंदिर व ईतर मंदिरात ही प्रभू श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात भजन व आरती गाऊन साजरा झाला. सायंकाळी स्वर नाद झंकार कार्यक्रम झाला. उद्या शुक्रवारी (ता.31) श्री प्रभू रामचंद्र यांच्या पालखीची भव्य मिरवणुक शहरातून काढण्यात येणार असून त्यात आदिवासी भोवाडे यांचे नृत्य असणार आहे. रात्री शोभेची दारू ही सोडण्यात येईल.