गोदावरी नदी ते हमरापूर पाझर तलाव पाईपलाईन कामाचा शुभारंभ ; हमरापूर येथील तीनशे एकर जमीन ओलिताखाली येणार

वैजापूर,२८ डिसेंबर / प्रतिनिधी :-15 व्या वित्त आयोग निधीतून मंजूर झालेल्या गोदावरी नदी ते हमरापूर पाझर तलाव पाईपलाईन कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यांच्याहस्ते बुधवारी (ता.28) करण्यात आला. या पाईपलाईनमुळे हमरापूर शिवारातील जवळपास तीनशे एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.

एक महिन्यांपूर्वी राम दरबार आश्रमाचे हभप हरिशरणगिरी महाराज व शिवगिरी आश्रमाचे हभप संदीपान महाराज यांच्याहस्ते या पाईपलाईन कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. या कामास आज  प्रत्यक्षात सुरुवात झाली.

यावेळी अन्वर शेख, रामनाथ पाटील चौधरी, सरपंच संजू मोरे, दत्तू पाटील खपके, सुनील पाटील गायकवाड, राजेंद्र शिनगारे, भीमराज मस्के, नारायण चौधरी, हंसराज चौधरी, संदिप चौधरी, अमोल चौधरी राहुल शिनगारे, किरण दादा पठारे, श्रीकिसन मोरे, शेषराव चौधरी आदी उपस्थित होते.