वैजापुरात सकल जैन समाजातर्फे महावीर जयंती जयंती उत्साहात साजरी

वैजापूर ,४ एप्रिल  / प्रतिनिधी :- येथील सकल जैन समाजातर्फे भगवान महावीर जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.‌ जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा, दुचाकी फेरी व एकता पदयात्रा काढण्यात आली. 

भगवान महावीरांचा संदेश ‘ जगा आणि जगी द्या ‘ प्रत्येकाच्या मनपटलावर बिंबवण्याची गरज असल्याचे मत भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त आयोजित कार्यक्रमात वक्त्यांनी केले. या कार्यक्रमात मॅरेथॉन स्पर्धा, दुचाकी फेरीतील विजेत्यांसह उत्कृष्ठ कला व नाट्य सादर करणाऱ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमाला आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान,  नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष विशाल संचेती, प्रकाश बोथरा, अकिल शेख, पंकज ठोंबरे, मेजर सुभाष संचेती, धोंडिरामसिंह राजपूत, राजु संचेती, इंदरचंद बोथरा, संतोष बोथरा, निखिल लुनावत, प्रफुल संचेती, प्रा.जवाहर कोठारी, संतोष लोढा, अनिल संचेती, ज्योती संचेती, ललिता बोहरा, दर्शना लोढा, सपना संचेती, सुभाष बोथरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजु संचेती यांनी केले.