शिऊर येथे “जाती तोडो समाज जोडो” अभियानांतर्गत बसपाची बैठक

वैजापूर,​१०​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- बहुजन समाज पार्टी औरंगाबाद जिल्हयाच्यावतीने  “जाती तोडो समाज जोडो” अभियानाअंतर्गत औरंगाबाद येथे 19 सप्टेंबरला होऊ घातलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर येथे बसपाची बैठक झाली.

या बैठकीस बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव पंडित बोर्ड, सचिव सचिन  बनसोडे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष समाधान जाधव, जिल्हाप्रभारी बाबासाहेब पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.औरंगाबाद येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी वैजापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील असे वैजापूर विधानसभा अध्यक्ष संतोष  पठारे यांनी बैठकीत सांगितले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे माजी विधानसभा अध्यक्ष  काशिनाथ बागुल, वैजापूर विधानसभा प्रभारी वाल्मिक वाघ, महासचिव बाळू शिनगारे, सचिव नितीन निकम, भिवगाव ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच वाल्मिक पठारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.