वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथे विजेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू

वैजापूर,​१०​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-विजेच्या धक्क्याने वृद्धाचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी (ता.10) सकाळी तालुक्यातील खंबाळा येथे घडली.  लांडे वस्ती, खंबाळा येथे घडली. सुदाम परसराम निर्मळ (वय 75 रा. लांडे वस्ती, खंबाळा) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे लांडे वस्ती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील वीज पुरवठा बंद झाल्यामुळे तो सुरळीत करत असताना त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.