महालगाव सोसायटीवर शिवसेनेचे अविनाश गलांडे यांचे वर्चस्व: चेअरमनपदी काळे तर व्हाईस चेअरमन आल्हाट यांची निवड

वैजापूर,​८​ ऑगस्ट /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील महालगाव सोसायटीवर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे यांचे वर्चस्व सिध्द झाले. सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची सोमवारी (ता.8) निवड करण्यात आली. त्यांचे समर्थक पुंजाराम काळे यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमन म्हणून चार्लस आल्हाट यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्यांचे अविनाश पाटील गलांडे यांनी अभिनंदन केले.महालगांव सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली यात शिवसेनेचे अविनाश पाटील गलांडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. या पॅनलचे  सर्वच्या सर्व तेरा उमेदवार विजयी झाल्याने शिवसेनेच्या एकहाती सत्ता आली आहे.  सोसायटीच्या या निवडणुकीत सर्वसाधारण मतदार संघातून पुंजाराम काळे, प्रकाश शेळके, चार्लस आल्हाट, मधुकर हुमे, विजय झिंजुर्डे, बापु शेळके,  दौलत आहेर, भागिनाथ जाधव हे विजयी झाले. महिला राखीव मतदारसंघातून मनिषा सिताराम गलांडे व उषा पंढरीनाथ टेमकर या तर भटक्या /विमुक्त जाती- जमाती मतदारसंघातून बाळासाहेब बुट्टे, इतर मागासवर्गीयमधून बाबासाहेब अनर्थे तसेच अनु. जाती/ जमाती मतदारसंघातून रावसाहेब तुळशीराम आल्हाट विजयी झाले होते.
सोसायटीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे   शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, उप तालुकाप्रमुख सिताराम भराडे,पंचायत समितीचे माजी सदस्य देविदास जाधव, बाजार समितीचे संचालक सुरेश आल्हाट, संभाजी डांगे, ग्रामपंचायत सदस्य कैलास शेळके, प्रकाश आल्हाट, तुकाराम आहेर, सुधाकर गलांडे, गणेश शेळके, संपत जाधव, डाॅ. अभय थावरे, सोसायटीचे माजी चेअरमन केशव शिनगारे, संपत शेळके, हरिभाऊ आल्हाट, सुनिल आल्हाट,राजु हुमे, राजु गलांडे, अमोल मलिक, योगेश मोहिते, नवनाथ गायकवाड, रभाजी आल्हाट, विकास जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.