सुराळा शिवारात समृध्दी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक ; दोन जण जखमी

वैजापूर ,२८ मार्च / प्रतिनिधी :- समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.रविवारी (ता.26) रात्री दहा वाजेच्या सुमारास  वैजापूर तालुक्यातील सुराळा शिवारात काही लोकांनी एका वाहनांवर दगडफेक केली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यातील मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे.राजस्थान येथील भाविक हे शिर्डी येथून दर्शन घेऊन समृद्धी महामार्गावरून जीपने छत्रपती संभाजीनगर कडे जात होते. त्यावेळी सुराळा शिवारात त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली.