वैजापूर-गंगापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वैजापूर ,२८ मार्च / प्रतिनिधी :- अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना  रविवारी (ता.26) सकाळी वैजापूर गंगापूर रस्त्यावर महालगाव शिवारात घडली.भाऊसाहेब आल्हाट (20 वर्ष) रा. मुद्देशवाडगाव ता. गंगापूर असे या घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे.

नवनाथ हा दुचाकी वर ( क्रमांक MH16, BX6553)  गंगापूरच्या दिशेने जात होता. त्यावेळी  महालगाव शिवारात विज कंपनी कार्याजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नवनाथला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच हवालदार  गुणवंत थोरात, पोलीस कॉन्स्टेबल जिरे, नवनाथ गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह रुग्णवाहिकेतून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी वीरगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.