वैजापूर शहरात ईद-उल-अजहा (बकरी-ईद) उत्साहात साजरी, पावसामुळे मशिदींमध्ये नमाज अदा

वैजापूर ,१० जुलै  /प्रतिनिधी :- त्याग आणि बलिदानाची प्रतिक असलेली ईद-उल-अजहा (बकरी ईद) रविवारी (ता.10) वैजापूर शहर व तालुक्यात पारंपारिक पध्दतीने व उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान ईद ची विशेष नमाज अदा करण्यात आली.पावसामुळे शहरातील विविध मशिदींमध्ये नमाजचे आयोजन आले होते.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होता त्यामुळे त्यामुळे सामूहिकरीत्या नमाज पठण केली गेली नव्हती. कोरोना काळात लोप पावलेला बकरी ईद (ईद-उल-अजहा) चा उत्साह वैजापूर शहरात आज दिसून आला. सकाळी 9 वाजता जामा मस्जिद मध्ये बकरी ईद ची नमाज झाली. मुस्लिम बांधव मशिदीबाहेर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहताना दिसला. सतत पाऊस सुरू असल्याने नमाज ईदगाह मैदानावर न होता जामा मस्जिद मध्ये अदा करण्यात आली. 
नमाज झाल्यानंतर मशिदीबाहेर सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, पोलीस निरीक्षक साम्राटसिंह राजपूत,एल, गोपनीय शाखेचे संजय घुगे, घोटकर यांनी मुस्लिम बांधवांना “ईद-उल-अजहा”च्या (बकरी ईद) शुभेछा दिल्या. शहर काझी हाफीजोद्दीन, जेष्ठ पत्रकार जफर ए.खान, माजी नगरसेवक काझी लईक इनामदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष मलिक काझी, शेख हनिफ सर, सय्यद सिकंदर अली, ऍड.सईद अली, रय्यस चाऊस, ऍड.राफे हसन आदींनी मुस्लिम बांधवांना बकरी ईद शुभेच्छा दिल्या.सतत धार पाऊस असल्याने काही हिंदू बांधवांनी घरूनच मोबाईलवर मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.