परसोडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी

वैजापूर ,​६​ जानेवारी  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त समरसता गत विधीच्यावतीने भारत देशामध्ये स्री शिक्षणाचा पाया उभारणाऱ्या स्त्रियांना आपल्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि सुधारणेचा वसा उचलणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या एक आगळ्यावेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक महिला क्रांतिकारी यांचे जीवन कार्य या विषयावर गावातील महिलांनी व मुलींनी  मनोगत व्यक्त केले. यामध्ये महिलांनी आपले विचार व्यक्त करताना जीवनामध्ये शिक्षणाचे महत्व समाजासमोर प्रखरपणे मांडले. यासाठी प्रोत्साहन पर पारितोषिक देण्यात आले.  

याप्रसंगी पर्यवेक्षक म्हणून बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक नारायणराव कवडे, शिक्षक रमेश धाडबळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर संजय राऊत यांनी केली. सदरील भाषणात सहभागी झालेल्या सर्व महिलांना व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अश्विनी शिंदे, वैशाली तारक, सविता नजन, शुभांगी धाडबळे, अनुराधा निकम, स्वाती कवडे, वृषाली वाघ, स्वाती लालसरे, जयश्री कवडे, शरयू निकम, जिजाबाई राऊत, संगीता राऊत या महिलांनी उपस्थिती लावली व  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.