शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त रांगोळी, निबंध, वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण

वैजापूर,४ जानेवारी /प्रतिनिधी :- विज्ञासागर कन्या प्रशाला खंडाळा येथे गोरखनाथ शिंदे व कचरु वेळंजकर यांच्या मार्गदर्शनाने मुरलीनाना थोरात, विजय मगर, प्रकाश वाघचौरे यांनी व शिवसेना शाखा व मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान यांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन व पूजन करण्यात आले. यावेळी छाया थोरात, कवडे यांनी औक्षण केले.

यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देण्यात आले. आहे.यावेळी कचरू वेळंजकर,जिल्हा परिषद सदस्य रामहरी बापू जाधव, साफियाबादवाडीचे सरपंच बाबासाहेब राऊत, उपतालुका प्रमुख गोरखनाथ शिंदे, देवराव पवार, संतोष कासलीवाल,अरुण जाधव शाखाप्रमुख विजय मगर, प्रकाश वाघचौरे, ग्रा प सदस्य संदीप पवार, शिवाजी जाधव, मातोश्री नर्मदा पतसंस्था चेअरमन मुरलीनाना थोरात, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जानराव, शांताराम वेळंजकर, गणेश बोर्डे, रहीम बागवान, रवींद्र ढगे , शालेय समिती उपाध्यक्ष प्रकाश आंबेकर, माळी महासंघ तालुकाध्यक्ष अशोक देवकर, विज्ञासागर कन्या प्रशाला सर्व स्टाफ, अनंत प्रज्ञा स्कुलचे योगेश सोनवणे, राहुल जेजुरकर सर, हेमा संचेती, छाया थोरात, महिला ग्रामसंघ पदाधिकारी राणी वाघचौरे, रुपाली बनकर, सुनीता जेजुरकर, कविता देवकर उपस्थित होते. कार्यक्रमातचे सूत्रसंचालन बाळासाहेब व्यवहारे यांनी केले.