सिध्दनाथ वाडगाव,शहापूर व पळसगाव येथे विविध विकास कामांचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर विधानसभा मतदारसंघातील सिध्दनाथ वाडगाव, शहापुर व पळसगाव येथे आ. रमेश बोरणारे यांच्या प्रयत्नाने मंजुर झालेल्या 60 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन आ. बोरणारे यांच्याहस्ते बुधवारी करण्यात आले.
मौजे सिध्दनाथ वाडगाव येथे जलजीवन 25 लक्ष 68 हजार रुपये कामांचे भूमिपूजन,मौजे शहापुर येथे जलजीवन 18 लक्ष 27 हजार रुपये व पेव्हर ब्लॉक बसविणे 4 लक्ष 50 हजार रुपये कामांचे भूमिपूजन, मौजे पळसगाव येथे जलजीवन 11 लक्ष 55 हजार रुपये कामांचे लोकार्पण अशा एकुण “60 लक्ष रुपये निधी” मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष काळवणे, किशोर  चव्हाण, उपतालुकाप्रमुख अनिल चव्हाण, उपकार्यकारी अभियंता अपसिंगेकर , माजी उपसभापती महेंद्र गंडे, पंचायत समिती सदस्य भानुदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
विभागप्रमुख सुनिल पोळ, उपविभागप्रमुख रामनाथ पाटेकर, विजय पा काकडे, विषंभर पा शिंदे, दादासाहेब पा औताडे, सरपंच अनिल राजगीरे, दशरथ पा जगताप, श्रीमंत काका शिंदे, नानासाहेब पा धोत्रे, शेषराव काका साळुंके, कैलास पा जगताप, राजुभाऊ धोत्रे, रमेश पा साळुंके, राहुल काळवणे, तात्याराव शिरसाठ, शाईनाथ पा चव्हाण, प्रमोद जाधव, दिगंबर गवळी, नंदूमामा गवळी, योगेश चव्हाण, दादासाहेब पा आंबाडे, कल्याण पा बारहाते, चंद्रभान राजदेव, सचिन नवले, दत्तुभाऊ राशिनकर, संतोष चव्हाण, राम चव्हाण, अर्जुन कानडे, दत्तु पा कानडे, प्रमोद महाजन, जिवन राजपूत, योगेश क्षीरसागर यांच्यासह  पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थीत होते.