वैजापूर तालुका भाजपतर्फे २० मार्च रोजी बूथ सक्षमीकरण विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

वैजापूर ,१८ मार्च / प्रतिनिधी :- भाजप प्रदेश कार्यालयाचे सूचनेनुसार वैजापूर तालुका भाजपतर्फे बूथ सक्षमीकरण अभियान 2023 अंतर्गत तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा 20 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.

मंडळातील सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष,  पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यशाळेत सहभाग घेणार असून या कार्यशाळेत बुध सक्षमीकरण पीपीटी, सोशल मीडिया प्रेझेंटेशन, बूथ स्तरावरील कार्य तसेच शक्ति केंद्रप्रमुख व अल्पकाळ विस्तारक यांच्या जबाबदाऱ्या. याबाबत जिल्ह्यातील पदाधिकारी  समीर राजूरकर, अरविंद डोणगावकर व गोविंद केंद्रे हे मार्गदर्शन करणार आहेत.. तालुक्यातील सर्व पदाधिकारी, बूथअध्यक्ष  शक्ती केंद्रप्रमुख, अल्पकाळ विस्तारक यांनी उपस्थित राहणे आवश्यक करण्यात आले आहे. शहरातील लाडगांव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे सकाळी अकरा वाजता कार्यशाळा सुरू होणार असून कार्यकर्त्यांसाठी स्नेहभाजनही ठेवण्यात आले आहे.अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत यांनी दिली.