वैजापूर शहर व परिसरातील विविध रस्त्यांच्या कामांचे आ. बोरणारे यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर ,१८ मार्च / प्रतिनिधी :- 

वैजापूर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामासाठी मंजूर झालेल्या निधीतून वैजापूर ते खंबाळा प्रजिमा – 29 रस्ता (7 कोटी रुपये) या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व कावेरी मंदीर ते साहेबराव मापारी वस्तीपर्यंत रस्ता (50 लाख रुपये) या कामांचे लोकार्पण शनिवारी आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेरभाई, जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककेचे संचालक रामहरी जाधव, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकिल सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शहर व परिसरातील भगगांव, खंबाळा, किरतपूर, गोयगांव,भऊर येथील ग्रामस्थांची गेल्या अनेक दिवसांपासूनची रस्त्याची मागणी होती. ती पूर्ण झाल्याबद्दल आ.रमेश पाटील बोरणारे यांचा सत्कार यावेळी ग्रामस्थांनी केला.या प्रसंगी आ. बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेरभाई,नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, शिवसेनेचे जेष्ट कार्यकर्ते खुशालसिंग राजपूत आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथराव मगर, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह राजपूत, तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव औताडे, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, राजेंद्र पाटील चव्हाण, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक  सुलभाताई भोपळे,  तालुकासंघटक पद्माताई साळुंके, शहरसंघटक सुप्रियाताई व्यवहारे, शहरप्रमुख पारस घाटे, भाजपचे शहरप्रमुख दिनेशसिंह राजपूत, युवासेना तालुकाप्रमुख सतीश हिवाळे, शहरप्रमुख श्रीकांत साळुंके, तालुका समन्वयक गणेश निकोले, प्रकाश छाजेड, सोपानराव निकम, रणजित चव्हाण, प्रमोद कुलकर्णी, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, सलीम वैजापूरी, महेश बुणगे, रावसाहेब मोटे, दौलतराव गायकवाड, कय्युमशेठ सौदागर,  निमेश (बापू) वाणी,  ज्ञानेश्र्वर टेके, शैलेश चव्हाण, बिलालभाई सौदागर, डॉ.निलेश भाटीया, शेख रियाज, इम्रान कुरैशी, गणेश खैरे, सखाहरी बर्डे, बजरंग मगर, दशरथ बनकर, राजेश गायकवाड, सुरेश तांबे, गोकुळ भुजबळ, बबन त्रिभुवन, बद्रिभाऊ चव्हाण नानासाहेब थोरात, प्रभाकर जाधव,  विजय काळे, बंडू गायकवाड, आण्णासाहेब शेळके, चांगदेव इंगळे, उत्तमराव (आप्पा) साळुंके, रंजकराव शेटे, संदीप बोर्डे, कपिल खैरे, बाळासाहेब सुतवणे, कमलेश आंबेकर, बळीराम राजपूत, पोपटराव भोसले, दिपक साळुंके, अशोक चव्हाण, भागीनाथ निकम, संतोष वाघ, बाबासाहेब  इंगळे, ज्ञानेश्वर मोटे, साहेबराव मापारी, रामकृष्ण जोरे, प्रशांत त्रिभुवन, सोन्याबापू गावडे, सरपंच अशोक जगताप, उध्दव बहीरट, सुदाम मोरे,  किशोर नाईकवाडी, भिका नाईकवाडी, बाबासाहेब टुपके, प्रा. किशोर साळुके, कैलास शेळके, सतिष खंडागळे, कैलास नांगरे, कैलास साळुंके, सदाशिव निर्मळ, बाबुराव वाणी यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.