भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांचा वाढदिवसानिमित्त शिऊर येथे भव्य नागरी सत्कार

वैजापूर,१३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापुरचे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांचा वाढदिवसानिमित्त शिऊर बंगला(ता. वैजापूर) येथे भव्य सत्कार करण्यात आला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत डॉ. परदेशी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.  शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाजार समितीचे संचालक संतोष गायके यांनी केले.  वाघला सोसायटीचे चेअरमन  शिवाजी गोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला भाजपाचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे नगरपरिषद गटनेते दशरथ बनकर,  डॉक्टर हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत नाना कंगले, सुभाष आव्हाळे, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत, माजी सरपंच चंद्रशेखर खांडगौरे,  पंचायत समितीचे माजी उपसभापती सज्जन शिंदे, शेतकरी नेते धनंजय धोर्डे, बाळासाहेब भोसले,  माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील, हिंगणे कन्नड चे माजी सरपंच अतुल निकम, बोरसरचे उपसरपंच सुनील बोडखे, सामाजिक कार्यकर्ते भगवान घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मधुकर पवार, संचालक संतोष गायक, टुणकीचे सरपंच काका गोरे,  बळ्हेगावचे सरपंच पांडुरंग सूर्यवंशी,  वाघला सोसायटीचे चेअरमन शिवाजी गोरे,  पंचायत समितीचे माजी उपसभापती सजनदादा शिंदे, भटाणाचे उपसरपंच गणेश चंदवडे,  गोकुळ सूर्यवंशी, अंचलगाव येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ईश्वर सुर्यवंशी,  बळ्हेगावचे पोलीस पाटील विजय बोडखे,  ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब सूर्यवंशी,  तलवाड्याचे दादाभाऊ मगर, लोणी खुर्दचे उपसरपंच आप्पासाहेब जाधव, टुणकीचे पोलीस पाटील रावण निकम  आदींसह परिसरातील अनेक नागरिकांनी डॉ. दिनेश परदेशी यांचे अभिष्टचिंतन करत त्यांना पुढील राजकिय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.