ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवण्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली वाळूज कोविड सेंटरची पाहणी

औरंगाबाद दि 14 : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज वाळूज परिसतील कोविड सेंटरची पाहणी केली यावेळी कोविड सेंटरमधील औषध साठा,ऑक्सिजन साठा,बेड ची संख्या पुरेपूर असल्याची खात्री करत रुग्णांशी संवाद साधून कोविड सेंटर मध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचाही आढावा घेतला तसेच कोविड सेंटर मध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवण्या संदर्भात सूचना दिल्या तसेच परिसरातील नागरिकांनी आवश्‍यकतेनुसारच घराबाहेर बाहेर पडत असतांना कोरोना नियमावलीचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

May be an image of one or more people, people standing, fruit and outdoors

दरम्यान वाळूज येथील मुख्य रस्त्यावरील श्रीराम किराणा स्टोअर मधील विक्रेते विनामास्क आढळल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत,मास्क वापरण्याबाबत सक्त ताकीद दिली,त्याचबरोबर काही ठिकाणी रस्तावर विणामास्क फिरणाऱ्या नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे मास्क लावण्याचे आवाहन केले तर काहीनां स्वतः मास्क देत मास्क वापरण्याची ताकीद दिली,

May be an image of one or more people, people standing and outdoors

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, तहसीलदार किशोर देशमुख, वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बांगर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संग्राम बामणे, डॉक्टर प्रशांत दाते,वडगांव को.चे सरपंच सचिन गरड,उपसरपंच पोपट हांडे, ग्रामसेवक गणेश धनवई आदिसह कोविड सेंटर मधील आरोग्य सेवक, तसेच सेविकांची उपस्थिती होती.