नागमठाण येथे 1 कोटी 18 लक्ष रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर ,११ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथे जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे तसेच ग्रामपंचायत नागमठाण यांच्या विशेष प्रयत्नाने एक कोटी अठरा लक्ष रुपये निधींच्या विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण शुक्रवारी (ता.10) करण्यात आले.

जिल्हा परिषद योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत 40 लाख रुपये तसेच गावातील अंगणवाडी क्रमांक एक व दोन नवीन इमारत 22 लक्ष 50 हजार रुपये, जिल्हा परिषद शाळा येथे पेवर ब्लॉक बसविणे 10 लक्ष रुपये या कामांचे भूमिपूजन तथा दलित वस्ती सुधार योजनेतून नाईक-सरोदे-येवले वस्ती येथील रस्ता नाली व जलकुंभ त्याचप्रमाणे ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोग योजनेतून वडार वस्ती रस्ता,आरो प्लांट, स्वच्छतागृह ग्रामपंचायत समोरील पेवर ब्लॉक, गायरान आदिवासी वस्ती येथे नवीन पाईपलाईन, भूमिगत गटार, मस्जिद येथे पेवर ब्लॉक, येवले वस्ती येथे स्तंभाचे बांधकाम, अंगणवाडी करिता गॅस शेगडी तसेच फर्निचर वितरण, बस स्टँड परिसरातील नाली बांधकाम, रमाई आवास योजनेच्या 7 घरकुलांचे, लोकसभागातील जिल्हा परिषद शाळा येथे मैदान दुरुस्ती, मुरूम भराव तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आदि कामांचे भूमिपूजन व  लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपतालुकाप्रमुख सिताराम पाटील भराडे, डॉ. प्रकाश शेळके, मोहन गायकवाड, अन्वर शेख, सरपंच अर्चनाताई खुरुद, उपसरपंच बाबासाहेब येवले, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, महाआघाडीचे गणेशदादा चव्हाण, उदयसिंह पवार तसेच टेंभी, जातेगाव नागमठाण/ चांदेगाव/ आवलगाव हमरापूर/  शनिदेवगाव, बाजाठाण, चेंडूफळ, गाढेपिंपळगाव येथील सरपंच,सोसायटी चेअरमन व  सर्व शाखाप्रमुख, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सभापती अविनाश पा गलांडे यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात नागमठाण येथे  विविध विकास कामाच्या माध्यमातून तीन कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सरपंच अर्चनाताई दत्तू खुरुद यांच्या कारकीर्दीतील कामांचा विशेष गौरव करण्यात आला.