वैजापूरच्या शिंदे-भाजप पदाधिकाऱ्यांवर केंद्रीय राज्यमंत्री दानवे भडकले

भेटीतील संभाषणाची चित्रफीत रेकॉर्डिंग ; वैजापूर येथील भाजप-शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगलट

वैजापूर ,९ जानेवारी  / प्रतिनिधी :- 

भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भेटीतील संभाषणाची चित्रफीत मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न भाजप – शिंदे सेनेच्या शिष्टमंडळातील एका पदाधिका-याच्या चांगलाच अंगलट आला. 

शिष्टमंडळातील पदाधिका-यांशी होणारे संभाषण मोबाईलद्वारे रेकार्ड होत असल्याचे संशय खुद्द राज्यमंत्र्याना आल्यावर त्यांनी पदाधिका-यांचा मोबाईल तपासणी केली असता त्यात रिकार्डिग झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे त्यांच्या संतापाचा पारा भडकला होता.अतिशय कडक शब्दात त्यांनी भेटीला आलेल्या भाजप -शिंदे सेनेतील पदाधिका-यांची सर्वासमक्ष कानउघाडणी केली. या संदर्भात प्राप्त माहितीनुसार वैजापूर शहरात जानेवारी महिन्याचे दुसऱ्या पंधरवड्यात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका देण्यासाठी भाजप – शिंदेसेना पक्षातील दुसऱ्या फळीतील पदाधिका-यांचे शिष्टमंडळ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी भेटीला गेले होते. या शिष्टमंडळातील सदस्यांनी दानवे यांचे मनमोकळेपणाने संवाद चालू असताना त्यांना मोबाईलमध्ये संभाषण रेकॉर्डिंग होत असल्याचा संशय बळावला. त्यांनी सबंधित पदाधिका-याचा  मोबाईल ततात्काळ ताब्यात घेऊन तपासल्यावर त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरल्यामुळे ते शिष्टमंडळावर जाम भडकले होते. त्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या भाजपाच्या येथील एका पदाधिका-यावर त्यांनी रोष व्यक्त करुन मला अडचणीत आणण्याचे उद्योग करु नका अशा शब्दांत त्यांनी कान उ़घडणी केल्याचे समजते. 

मंत्र्यांची भेटीवर संशयाचे विरजण  

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला गेलेल्या भाजप – शिंदे गटातील पदाधिका-यांचा मंत्र्यांशी घडून आलेली चर्चा संवादाचे संभाषण 

मोबाईलमध्ये घेऊन नंतर स्थानिक परिसरात ते व्हायरल करुन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करणा-या पदाधिका-यांला त्यांचे संभाषण रेकार्ड करणे चांगलेच महागात पडले. 

व्हायरल क्लिपचा धसका

अस्सल ग्रामीण बोली भाषेतून शाब्दिक कोटया करणारे केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे अलीकडे त्यांच्या काही ठिकाणी केलेल्या वक्तव्याचा क्लिपमुळे  टीकाकारांच्या रडारवर आले होते.त्यामुळे दानवे यांनी आता संभाषण रेकार्ड होण्याचा चांगलाच धसका घेतला आहे. दरम्यान संभाषण केल्यावरून शिंदे सेनेचे पदाधिका-यांवर भडकण्यापर्यत पोहचलेले दानवे नेमके काय बोलले होते यांची चर्चा जोरात होत आहे.