वैजापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभारासंदर्भात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड यांना भाजप कार्यकर्त्यांचे निवेदन

वैजापूर ,​२ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील गलथान कारभारासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांना गुरुवारी (ता.02) निवेदन देऊन उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना आवश्यक सुविधा व उपचार मिळत नसल्याची तक्रार केली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे आज तालुकास्तरीय सर्व विभागाच्या आढावा बैठकीसाठी वैजापूर आले असता भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, कैलास पवार, ज्ञानेश्वर पाटील जगताप, नगरसेवक दशरथ बनकर, पंचायत समिती सदस्य सुरेश राऊत, भाजपचे तालुका सरचिटणीस नितीन तांबे, नगरसेवक शैलेश चव्हाण, नगरसेवक बजरंग मगर, नगरसेवक गणेश खैरे, प्रेमसिंग राजपूत,  सोनू राजपूत,  पवन विश्वासू, सागर राजपूत, निलेश पारख, शैलेश पोंदे, गोरख मापारी, गौरव दौडे, गिरीश चापानेरकर यांनी डॉ.कराड यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. डॉ. कराड यांनी समाधानकारक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.