धर्मादाय शासकीय सामुदायिक विवाह सोहळा १८ मार्चला वेरूळमध्ये 

छत्रपती संभाजीनगर,१ मार्च  / प्रतिनिधी :-  महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्त  महेन्द्र महाजन यांच्या आवाहनानुसार छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख सहआयुक्त सुरेंद्र बियाणी यांनी औरंगाबाद मध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा  १८ मार्च  रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा पार पाडण्यासाठी समिती नियुक्त केलेली असुन पुढील सर्व जबाबदारी ही धर्मादाय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती  यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगितले.

तसेच या उपक्रमास व सोहळ्यास  इच्छुक जोडपे यांनी खालील नमूद  ठिकाणी त्यांची नावाची नोंदणी आवश्यक त्या दस्त ऐवज सह दाखल करावी असे आवाहन केले आहे.


विवाह समिती देणार

वधू -वराचे प्रत्येकी २०-२० वर्‍हाडी, सोन्याचे मनी मंगळसूत्र, संसार उपयोगी साहित्य आणि सर्वांनाच भोजन.

समाजातील दानशुर लोकांनी या उपक्रमास मदत करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष दयारम बसय्ये बंधू यांनी केले आहे.

१८ मार्चला वेरूळ येथील बाबाजी (संत जनार्दन स्वामी आश्रम ) यांच्या आश्रमातील भव्य पटांगणात रोषणाई करून विवाह सोहळा थाटामाटात  होणार असुन या कार्यास संत जनार्दन स्वामी आश्रमचे प्रमुख महंत शांतीगीरी महाराज यांच्या  मार्फत भोजन व इतर विषेश सहकार्य होत आहे असे समितीचे सदस्य ॲड चंद्रकांत पाटील वरूडीकर व अँड मनिषा दसपुते यांनी सांगितले. 

आवश्यक कागदपत्रे
वर वधूचे आधारकार्ड, पॅन कार्ड, ४-४ पासपोर्ट फोटो, जन्म दाखला, शाळेची टी.सी.
४ साक्षीदार आणि ओळखपत्र.
इतर माहिती नोंदणी संकलन कक्षावर मिळेल.  

विवाह  नोंदणी संकलन कक्ष
खालील ठिकाणी सकाळी १० ते संध्याकाळी  ६ या वेळेत इच्छुक जोडप्यांनी कागदपत्र व विहित प्रक्रिया पुर्ण करावी असे विवाह समितीचे सदस्य ॲड श्रीकांत आर. मिश्रा,ॲड चंद्रकांत पाटील वरूडीकर व अँड मनिषा दसपुते यांनी सांगितले.

१-  श्री रामचंद्र मंदीर मठ. श्री दयाराम बसय्ये बंधुजी. मो. क्र  9422212045

२- श्री भक्ती मंदीर – काळा गणपती ट्रस्ट एन1 औरंगाबाद. श्री कुलकर्णी 
मो. क्र  9823992459.

३- श्री भद्रा मारूती मंदीर ट्रस्ट, खुलताबाद. बारगळ . 9665171769

४- श्री एकनाथ मंदीर ट्रस्ट पैठण
श्री.वाणी 9850130259

५- श्री गुरूसिंग सभा गुरूव्दारा, उस्मानपुरा. श्री हरविंदर बिंद्रा .

६-श्री देवी दाक्षियाणी मंदीर, लासुर
श्री मुनोत  9404844409.

७- श्री गजानन महाराज मंदीर ट्रस्ट, औरंगाबाद श्री वक्ते  9422212845.

8८- श्री.अंबरशी संस्थान सिल्लोड.
श्री बोरूडे . मो. क्र 9881451971

९- श्री.वैष्णोदेवी संस्थान, वाळूज पंढरपूर औरंगाबाद.

आपण इच्छित देणगी खालील बँक खात्यात देऊ शकता.
बँक- देवगिरी नागरी सहकारी बँक
औरंगाबाद  – शाखा – गुलमंडी
IFSC – DEOB 0000008
नाव- धर्मादाय संघटना सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती
खाते क्रमांक- 080910002000058.
———————————
या नोंदणी करता आपण यांच्याशी संपर्क करू शकता.

ॲड श्रीकांत आर मिश्रा.
समिती सदस्य
मो क्रमांक- 7709789777  / 8698538888.